आपल्याला ‘विज्ञानयुगा’त टिकून राहणारे सक्षम नागरिक निर्माण करायचे असतील तर, त्यांच्या एकूण जडणघडणीमध्ये ‘लिबरल आर्टस’ला स्थान असणं खूप गरजेचं आहे
तंत्रज्ञान हे केवळ तुम्हांला अधिक शक्ती देणारं एक साधन आहे. त्याचा उपयोग कसा करायचा, हे तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. मानवी मूल्यांचा शोध घेण्यासाठी, त्यांचा आविष्कार करण्यासाठी आणि मानवी जीवनाचे कंगोरे दाखवून त्याविषयीची संवेदनशील जाणीव निर्माण होण्यासाठी उत्तम साहित्याची मदत होते. विज्ञानयुगामध्ये प्रगती करायची असेल तर ते आवश्यक आहे.......